आचार्य बाळशास्त्री जांभेकर (१८१२-१८४६)

  • आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सिंधुदूर्ग जिल्ह्यातील "पोभुर्ते" या गावी झाला. वयाच्या १३ व्या वर्षी रामदास स्वामी, संत तुकाराम, वामन व मोरोपंत यांच्या मराठी साहीत्य कृतीचा अभ्यास त्यांनी केला. 
  • १८२५ मध्ये बाळशास्त्री जांभेकर हे मुंबई येथे आले व त्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. तसेच जांभेकर यांनी गणित विषयात प्राविण्य मिळविले. विद्यार्थी असतानाच गणित विषयातील प्राविण्यामुळे जांभेकर हे गणिताचे प्राध्यापक बनले. 
  • १९३० मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी जांभेकर हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उप सचिव / डेप्युटी सेक्रेटरी झाले. 
  • पुढे ब्रिटीश शासनातर्फे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणुन त्यांची नेमणुक झाली होती. या दरम्यान त्यांनी कानडी भाषेचा अभ्यास केला. 
  • ०६ जानेवारी १८३२ रोजी मराठी भाषेतील पहीले वृत्तपत्र "दर्पण" हे त्यांनी सुरु केले. हे वृत्तपत्र एकुण ०८ पानाचे होते. दर्पण वृत्तपत्राचे त्रेमासिक शुल्क ०६ रु इतके होते. दर्पण हे वृत्तपत्र इंग्रजी व मराठी भाषेतुन प्रकाशित होत होते. दर्पण वृत्तपत्र सुरु केल्यामुळेच बाळशास्त्री जांभेकर यांना "दर्पणकार" असे म्हणतात. 
  • १८३४ मध्ये जांभेकर एल्फिस्टन कॉलेजचे साहाय्यक प्राध्यापक झाले. भारतीय शिलालेख व ताम्रपटाचे त्यांनी वाचन केले. 
  • १८४० मध्ये दर्पण साप्ताहिक बंद पडले म्हणुन बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहीले मासिक "दिग्दर्शन" हे सुरु केले. दिग्दर्शन हे मासिक प्रकाशित करण्यामागे भौतिक शास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार करणे हा प्रमुख उद्देश बाळशास्त्री जांभेकर यांचा होता. 
  • १८४६ मध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांचा मृत्यु झाला.
  • ब्रिटीशांच्या वतीने १८४० मध्ये सर जेम्स कर्नाक यांनी त्यांना "जस्टीस ऑफ पिस" ही पदवी दिली. बाळशास्त्री जांभेकर यांची ग्रंथ संपदा :- 
१) शुन्यलब्धी (महत्वाचे)
५) इंग्लंड देशाची बखर - १८३२
२) बाल व्याकरण- १८६३
६) हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास - १८४९
३) सार संग्रह १८३७
७) भुगोल विद्या व ज्योतिषशास्त्र.
४) हिंदुस्तानचा इतिहास - १८४६