भारतीय दंड संहिता (1860) / कलम

( व्याख्या कलमे 10 ते 52 ) ( वाढीव शिक्षा कलम 75 )
  • कलम 10 :-पुरूष किवा स्त्री हया शब्दाचा अर्थ 
  • कलम 11 :-व्यक्ती किवा पुरूष 
  • कलम 14 :-शासनाचा सेवक 
  • कलम 21 :-लोकसेवक 
  • कलम 22 :-जंगम मालमत्ता 
  • कलम 23 :-अन्यायाची प्राप्ती / अन्यायाचे नुकसान 
  • कलम 24 :-लबाडीने 
  • कलम 25 :-कपटाने 
  • कलम 26 :-मानन्यास कारण 
  • कलम 28 :–बनावट वस्तू तयार करणे (नकलीकरण) 
  • कलम 29 :-दस्तऐवज 
  • कलम 30 :-किंमतीचा दस्तऐवज / मूल्यवान रोखा 
  • कलम 34 :-सामाईक इरादा 
  • कलम 39 :-आपखुषीने / इच्छापुर्वक
  • कलम 40 :–अपराध / गुन्हा 
  • कलम 44 :-क्षती / नुकसान / ईजा 
  • कलम 52 :-इमानाने / प्रामाणिकपणे 
  • कलम 75 :-वाढीव शिक्षा प्रकरण 12 ( खोटी नाणी व स्टॅम्प ) आणि प्रकरण 17 ( मालमत्ते संबंधीचे गुन्हे कलम 378 ते 462 ) याखाली पुर्वशिक्षा असता वाढीव शिक्षा
प्रकरण 4 थे ( साधारण अपवाद )
  • कलम 76 :-गैरसमजुतीने केलेले कृत्य ( सरकारी नोकरास कायदयाचे संरक्षण ) कायद्याने बांधील असलेल्या सरकारी नोकराने गैरसमजुतीने केलेले कृत्य 
  • कलम 79 :-कायदयाचे समर्थन असणा-य परंतु वस्तुस्थितीच्या चुकभूलीमुळे तसा पाठींबा असल्याचे समजणाच्या मणूष्याने केलेले कृत्य ( खाजगी इसमास कायदयाचे संरक्षण ) 
  • कलम 80 :-कायदेशीर कृत्य करित असतांना अपघाताने घडलेले कृत्य 
  • कलम 81 :-गुन्हेगारी उद्देश नसतांना संभाव्य नूकसान टाळण्यासाठी व नुकसानीस प्रतिबंध करण्या साठी केलेले कृत्य
  • कलम 82 :-7 वर्षाहून कमी वयाच्या मुलाने केलेले कृत्य 
  • कलम 83 :-7 वर्षापेक्षा जास्त व 12 पेक्षा कमी वयाच्या व प्रौढबुध्दी नसलेल्या मुलाचे कृत्य 
  • कलम 84 :-वेडया मणुष्याने केलेले कृत्य  
  • कलम 85 :-स्वतःच्या इच्छेविरूध्द चढविलेल्या नशेमुळे विचार करण्यास असमर्थ असलेल्या मणुष्याने केलेले कृत्य 
  • कलम 86 :-ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किवा जाणिव आवश्यक असते असा अपराध ठरणारे कृत्य नशा केलेल्या मणुष्याने केले तर 
  • कलम 90 :-भीतीने अगर गैरसमजुतीने दिलेली भ्रमीष्ठ व्यक्तीची किवा बालकाची संमती 
  • कलम 94 :-धमकी देऊन एखात्याकडून करवून घेतलेले कृत्य
  • कलम 95 :-क्षुल्लक नुकसान असणारे कृत्य 
  • कलम 96 :-खाजगी नात्याने बचाव करण्याच्या हक्कावरून केलेले कृत्य 
  • कलम 97 :-शरीराचा व मालमत्तेचा खाजगी नात्याने बचाव करण्याचा हक्क 
  • कलम 98 :-वेड्या माणसाने केलेल्या कृत्या पासुन वैयक्तीक संरक्षणाचा हक्क
  • कलम 99 :-ज्या कृत्यांचे विरूध्द वैयक्तीक संरक्षणाचा हक्क नाही अशी कृत्ये
  • कलम 100 :-शरीराचा वैयक्तीक संरक्षणाचा हक्क बजावतांना जीव केव्हा घेता येतो 
  • कलम 101 :-मृत्यू शिवाय दुसरे एखादे नुकसान करण्याचा अधिकार 
  • कलम 102 :-खाजगी नात्याने शरीराचा बचाव करण्याचा हक्क कधी उत्पन्न होतो आणि कधीपर्यंत असतो 
  • कलम 103 :-मालमत्तेच्या वैयक्तीक संरक्षणाचा हक्क बजावतांना जीव केव्हा घेता येतो. 
  • कलम 104 :-मृत्यू शिवाय दुसरे एखादे नुकसान करण्याचा अधिकार 
  • कलम 105 :-खाजगी नात्याने मालाचा बचाव करण्याचा हक्क कधी उत्पन्न होतो आणि कधीपर्यंत असतो 
  • कलम 106 :-जीव घेण्याच्या उद्देशाने अंगावर चालून आल्याने निरपराध मणुष्यास दूखापत होण्याचा धोका असता त्याविरूध्द वैयक्तिक संरक्षणाचा हक्क
प्रकरण 5 वे ( मदत करण्याविषयी ) कलम 107 ते कलम 116
  • कलम 107 :-एखात्या कृत्यास मदत करणे 
  • कलम 108 :-मदत करणारा किवा चिथावणी देणारा 
  • कलम 109 :-कोणी एखाद्या कृत्यास मदत केली आणि त्यामुळे केलेले कृत्य घडले पण त्या अपराधास मदत करण्याबद्दल शिक्षा सांगितली नसेल तेव्हा 
  • कलम 114 :–अपराध घडला त्यावेळी मदत करणारा जर जवळ असेल तर तो अपराध त्यानेच केला असे समजावे 
  • कलम 115 :-फाशीच्या किंवा आजन्म कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यास मदत केली परंतु अपराध घडला नाही तर 
  • कलम 116 :-ज्या अपराधास कैदेची शिक्षा सांगितली आहे अशा अपराधास मदत केली पण त्या मदतीमुळे तो अपराध घडलाच नाही तर
(अन्यायाचे संगनमत किवा फौजदारी पात्र कट ) कलम 120 (अ) व कलम 120 (ब)
  • कलम 120 अ) :-अन्यायाचे संगनमत किवा फौजदारी पात्र कट याची व्याख्या 
  • कलम 120 ब) :-अन्यायाचे संगनमताबद्दल किवा फौजदारी पात्र कटाबद्दल शिक्षा फाशी अगर जन्मठेप किवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा सांगीतली असेल तर मुळ गुन्हयइतकिच शिक्षा इतर कमी प्रतीचा गुन्हा असेल तर 6 महिने कैद व दंड
प्रकरण 8 वे ( लोकांच्या स्वस्थपणाविरूध्द अपराध ) कलम 141 ते कलम 160
  • कलम 141 :-बेकायदेशीर जमावाची व्याख्या 
  • कलम 142 :-बेकायदेशीर जमावाचा सदस्य
  • कलम 143 :-बेकायदेशीर जमावाचा सदस्य असल्याबद्दल शिक्षा 6 महिने कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / बिनातडजोडीचा 
  • कलम 144 :-प्राणघातक शस्त्र घेऊन बेकायदेशीर जमावात सामिल होणे 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / बिनातडजोडीचा 
  • कलम 145 :-बेकायदेशीर जमावाला निघून जाण्याचा आदेश दिला आहे हे माहित असुनही त्या जमावात सामिल होणे किवा थांबणे 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / बिनातडजोडीचा कलम 146 :-दंगा करणे याची व्याख्या 
  • कलम 147 :-दंगा केल्याबद्दल शिक्षा 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / बिनातडजोडीचा 
  • कलम 148 :-प्राणघातक शस्त्र घेऊन दंगा केल्याबद्दल शिक्षा 3 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / बिनातडजोडीचा
  • कलम 149 :-बेकायदेशीर जमावाचे समान ऊद्दीष्ट साध्य करण्यासाठी त्या जमावातील एका जरी व्यक्तीने काही अपराध केला तर त्या जमावातील प्रत्येक सभासद दोषी असेल 
  • कलम 159 :-दंगल किवा मारामारीची व्याख्या 
  • कलम 160 :-दंगल किवा मारामारी केल्याबद्दल शिक्षा 1 महिना कैद / 100 रू.दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / बिना तडजोडीचा
प्रकरण 9 वे (सरकारी नोकराने केलेले किंवा त्या संबंधीचे अपराध ) कलम 167 ते कलम 171
  • कलम 167 :-नुकसान करण्याच्या हेतूने सरकारी नोकराने चूकीचा दस्तऐवज किवा चूकीचे भाषांतर करणे 3 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / बिना तडजोडीचा 
  • कलम 170 :-एखाद्या व्यक्तीने सरकारी नोकर नसतांना तसे असल्याची बतावणी करणे (तोतयेगिरी करणे) 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / अजामीनपात्र / बिनातडजोडीचा
  • कलम 171 :-कपट करण्याच्या इराद्याने सरकारी नोकराच्या गणवेषाप्रमाणे गणवेष घालणे किवा त्याच्या चिन्हा प्रमाणे चिन्ह बाळगणे 3 महिने कैद / 200 रू. दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / बिनातडजोडीचा
प्रकरण 10 वे (सरकारी नोकराच्या कायदेशीर अधिकाराच्या अपमानाविषयी ) कलम 177 ते कलम 188
  • कलम 177 :-सरकारी नोकराला जाणुनबुजून खोटी माहिती देणे 6 महिने कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र/जामीनाचा /बिनतडजोडीचा अपराध घडल्यासंबंधी अपराधास प्रतिबंध करण्या विषयी किवा अपराध्याला अटक करण्याविषयी असेल तर 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र/जामीनाचा /बिनतडजोडीचा 
  • कलम 179 :-प्रश्न विचारण्याचा ज्या सरकारी नोकराला अधिकार आहे त्या सरकारी नोकराने प्रश्न विचारला असता उत्तर देण्याचे नाकारणे । 6 महिने कैद / 1000 रू. दंड / दोन्ही अदखलपात्र जामीनाचा /बिनतडजोडीचा
  • कलम 180 :-सरकारी नोकराकडे दिलेल्या निवेदनावर सही करण्याचा कायदेशीर आदेश दिला असता निवेदनावर सही न करणे 3 महिने कैद / 500 रू. दंड / दोन्ही अदखलपात्र/जामीनाचा /बिनतडजोडीचा 
  • कलम 182 :-आपल्याला कायद्याने दिलेल्या अधिकारांचा उपयोग दुस-याचे नूकसान करण्यासाठी करावा या ऊद्देशाने सरकारी नोकराला खोटी खबर देणे 6 महिने कैद / 1000 रू. दंड / दोन्ही अदखलपात्र/जामीनाचा /बिनतडजोडीचा
  • कलम 186 :-सरकारी नोकर आपले कायदेशीर सरकारी काम करीत असता त्यास हरकत घेणे 3 महिने कैद / 500 रू. दंड / दोन्ही अदखलपात्र/जामीनाचा /बिनतडजोडीचा
  • कलम 187 :-सरकारी नोकराला मदत करणे कायद्याने भाग असतांना मदत करण्याचे टाळणे 1 महिने कैद / 200 रू. दंड / दोन्ही अदखलपात्र/जामीनाचा / बिनतडजोडीचा आणि अशी मदत जर दंगा रोखण्याकरता अगर आरोपीस अटक करण्याकरता असेल तर 6 महिने कैद / 500 रू. दंड / दोन्ही 10
  • कलम 188 :-सरकारी नोकराने कायदेशीरपणे जाहीर केलेला आदेश न मानने असा आदेश न मानल्यामुळे अटकाव , त्रास , नुकसान अगर धोका ऊत्पन्न झाला तर महिना कैद / 200 रू. दंड / दोन्ही दखलपात्र/जामीनाचा /बिनतडजोडीचा आदेश न मानल्यामुळे मानवी, जिवीत, आरोग्य किवा सुरक्षितता यांना धोका पोचला असेल तर 6 महिने कैद / 1000 रू. दंड / दोन्ही दखलपात्र/जामीनाचा /बिनतडजोडीचा
प्रकरण 11 वे ( खोटी साक्ष व पुरावा आणि न्यायालयाच्या - विरोधी अपराधां विषयी ) कलम 191 ते 225
  • कलम 191 :- खोटी साक्ष देणे किवा खोटा पुरावा देणे व्याख्या 
  • कलम 193 :- खोटी साक्ष किवा खोटा पुरावा दिल्याबद्दल शिक्षा न्यायालयाचे काम चालु असतांना जणुनबुजुन खोटी साक्ष किवा खोटा पुरावा देणे 7 वर्ष कैद आणि दंड अदखलपात्र/जामीनाचा दूस-या कोणत्याही प्रकरणात जाणुनबुजून खोटी साक्ष किवा खोटा पुरावा देणे 3 वर्ष कैद आणि दंड अदखलपात्र/जामीनाचा/ बिनतडजोडीचा
  • कलम 201 :- आरोपीचा बचाव करण्यासाठी अपराधाचा पुरावा नाहिसा करणे किवा त्याबद्दल खोटी माहिती देणे असा अपराध मृत्युच्या शिक्षेस पात्र असेल तर 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र किवा अदखलपात्र/जामीनाचा आणि अपराध जर आजन्म कैदेच्या शिक्षेच्या किवा 10 वर्षापर्यंत कैदेच्या शिक्षेस पात्र असेल तर 3 वर्ष कैद आणि दंड अदखलपात्र/जामीनाचा आणि अपराध 10 वर्षापर्यंत नसलेल्या इतक्या मुदतीच्या कैदेच्या शिक्षेस पात्र असेल तर त्या अपराधासाठी दर्शविलेल्या सर्वाधिक मुदतीच्या 1/4इतक्या मुदतीच्या कैदेची आणि दंडाची शिक्षा अदखलपात्र/जामीनाचा
  • कलम 211 :-नुकसान करण्याच्या इराद्याने एखाद्या व्यक्तीवर गुन्हा केल्याचा खोटा आरोप लावणे 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र/जामीनाचा /बिनतडजोडीचा आणि ज्या अपराधाचा दोषारोप केला त्यास मरणाची ,आजन्म कारावासाची किवा 7 वर्षापेक्षा अधिक कैदेची शिक्षा असेल तर त्यास 7 वर्ष कैद आणि दंड अदखलपात्र/जामीनाचा /बिनतडजोडीचा
  • कलम 224 :-ज्या आरोपीला अटक करावयाची आहे त्याने आपल्या कायदेशीर अटकेला प्रतिकार करणे किवा हरकत घेणे 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र/जामीनाचा / बिनतडजोडीचा
  • कलम 225 :-एखाद्या दुस-या व्यक्तीच्या कायदेशीर अटकेला प्रतिकार करणे किवा हरकत घेणे 2 वर्ष कैद व दंड दखलपात्र/जामीनाचा जर त्या आरोपीवर आजन्म कैद किवा 10 वर्ष कैदेची शिक्षा होण्याजोगा आरोप असेल तर 3 वर्ष कैद व दंड दखलपात्र/बिनाजामिनाचा / बिनतडजोडीचा जर त्या आरोपीवर मरणाची शिक्षा होण्याजोगा आरोप असेल तर 7 वर्ष कैद व दंड दखलपात्र/बिनाजामिनाचा / बिनतडजोडीचा जर त्या आरोपीवर आजन्म किवा 10 वर्षे कैद, मरणाची शिक्षा कोर्टाने ठोठावली असेल तर आजन्म /10 वर्षे कैद व दंड दखलपात्र/बिनाजामिनाचा 13
प्रकरण 12 वे ( नाणी व सरकारी मुद्रांक यासंबंधी अपराध ) कलम 231 ते कलम 233
  • कलम 231 :-नकली नाणे बनवणे 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/बिनाजामिनाचा / बिनतडजोडीचा 
  • कलम 233 :-नकली नाणे बनवण्यासाठी साधन तयार करणे किंवा ते साधन विकणे 3 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र बिनाजामिनाचा / बिनतडजोडीचा
प्रकरण 14 वे ( लोकांचे आरोग्य सुरक्षितपणा सोय लज्जा व सदाचरण याविरूध्द अपराध ) कलम 279, 293, 294
  • कलम 279 :-मानवाच्या जीवास धोका होईल अशाप्रकारे अविचाराने, हयगयीने, बेदरकारपणे सार्वजनिक रस्त्यावर गाडी चालविणे किवा घोड्यावर बसून जाणे 6 महिने कैद / 1000 रू. दंड / दोन्ही दखलपात्र/जामिनपात्र/बिनतडजोडीचा
  • कलम 293 :- तरूण व्यक्तींना अश्लील वस्तू विकणे 3 वर्ष कैद / 2000 रू. दंड / दोन्ही दुसन्या आणि त्यानंतरच्या अपराधाबद्दल 7 वर्ष कैद आणि 5000 रू. दंड दखलपात्र / जामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 294 :- अश्लील कृत्य करणे किवा गाणी म्हणणे 3 महिने कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामिनपात्र / बिनतडजोडीचा
प्रकरण 15 वे ( धर्मासंबंधी अपराध ) कलम 295, 295(अ), 298
  • कलम 295 :- एखाद्या जातीच्या लोकांच्या धर्माचा अपमान करण्याचे ईराट्याने भजनाच्या जागेचे नुकसान करणे अगर ती अपवित्र करणे 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र/ जामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 295(अ) :-एखाद्या वर्गाच्या धर्माचा किंवा त्यांच्या धार्मिक श्रध्दांचा अपमान करून त्यांच्या धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या इच्छेने दृष्ट बुध्दीने कृती करणे 3 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र/अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 298 :- धार्मिक भावना दुखावण्याचे बुध्दीपुरस्सर इराश्याने शब्द उच्चारणे किवा हावभाव करणे 1 वर्ष कैद / दंड / दोन्ही अदखलपत्र/ जामीनपात्र / बिनतडजोडीचा ०४
प्रकरण 16 वे ( मानवी शरीरासंबंधी अपराध ) कलम 299 ते कलम 318
  • कलम 299 :- सदोष मणुष्यवधाची व्याख्या 
  • कलम 300 :- खुनाची व्याख्या 
  • कलम 301 :- ज्या माणसाचा जीव घेण्याचा इरादा होता तो सोडून दुस-याच माणसाचा जीव घेवून सदोष मणुष्यावधाचा गुन्हा करणे
  • कलम 302 :- खूनास शिक्षा मरणाची किवा जन्मठेप आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 304 :- खून नसलेल्या सदोष मणुष्यवधाबद्दल शिक्षा आजन्म /10 वर्ष कैद व दंड जीव घेण्याच्या इराद्याने किंवा तशी दुखापत करण्याचा इरादा न्हवता। आजन्म /10 वर्ष कैद व दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम304(अ) :-अविचाराने,हयगयीने किवा निष्काळजीपणाने मृत्यूघडवून आणणे । 10 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र/ जामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 304(ब) :-हुंडाबळी 1)विवाहित स्त्रीचा मृत्यू झाला आहे 2)मृत्यू लग्नानंतर 7 वर्षाचे आत झाला आहे 3)जाळपोळ करून अगर भाजून। 4)अगर शारिरीक दूखापत करून 5)मृत्यू घडण्यापूर्वी त्या स्त्रीला क्रूरपणे वाग वले जात होते आणि त्यामागे हुंड्याची मागणी होती 6)मृत्यू स्त्रीच्या नव-याने अगर नातेवाईकाने | केला पाहिजे शिक्षा जन्मठेप परंतू 7 वर्षांची शिक्षा दिलीच पाहिजे असे सेशन कोर्टावर बंधन आहे दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा व सेशन कमिट आहे
  • कलम 306 :-आत्माहत्या करण्यास भाग पाडणे किवा मदत करणे 10 वर्ष कैद व दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा कलम 307 :-खून करण्याचा प्रयत्न करणे 10 वर्ष कैद व दंड । दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा जर त्या कृत्याने दुखापत झाली तर आजन्म / 10 वर्षे कैद व दंड। दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा आणि जर जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या इसमाने ते कृत्य केले आणि दुखापत झाली तर फाशीची शिक्षा दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा 
  • कलम 309 :- आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे 1 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 317 :-12 वर्षा पेक्षा कमी वयाच्या मुलाच्या आईने किवा बापाने अगर त्याचा संभाळ करणाच्या व्यक्तीने त्या मुलाचा पूर्णपणे त्याग करण्यासाठी टाकणे किवा सोडून देणे 7 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / बिनतडजोडीचा 
  • कलम 318 :- एखादे मुल जन्मल्यानंतर ते मेले असता ते मुल मेले ही गोष्ट लपवून ठेवण्याच्या इराद्याने त्या मुलाचे प्रेत पुरने किवा त्याची विल्हेवाट लावणे 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र/ जामीनपात्र / बिनतडजोडीचा
( दुखापती विषयक अपराध ) कलम 319 ते कलम 338
  • कलम 319 :-साधी दुखापत व्याख्या 
  • कलम 320 :-मोठी दुखापत व्याख्या 
  • कलम 323 :-इच्छापूर्वक दुखापत पोचवण्याबद्दल शिक्षा 1 वर्ष कैद / 1000 रू.दंड / दोन्ही अदखलपात्र/ जामीनपात्र / तडजोडीचा 
  • कलम 324 :-घातक शस्त्रांनी इच्छापुर्वक दुखापत पोचवणे 3 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 325 :-इच्छापुर्वक मोठी दुखापत पोचवण्याबद्दलशिक्षा 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र / जामिनपात्र / तडजोडीचा 
  • कलम 326 :-घातक शस्त्रांनी ईच्छापुर्वक मोठी दुखापत पोचवणे आजन्म कैद / 10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 330 :- जबरदस्तीने कबुलीजबाब घेण्यासाठी किवा मालमत्ता परत करण्यास भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र / जामीनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 332 :- सरकारी नोकर आपले सरकारी काम करत असतांना दहशतीने त्याला कर्त्यव्यापासून परावृत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत पोचवणे 3 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र/ जामीनपात्र / बिनतडजोडीचा 20
  • कलम 336 :- अविचाराचे किवा हयगयीचे कृत्य करून दूस-यांच्या जिवितास किवा व्यक्तीगत सुरक्षिततेस धोक्यात आणणारी कृती 3 महिने कैद / 250 रू. दंड / दोन्ही दखलपात्र/ जामीनपात्र / बिनतडजोडीचा 
  • कलम 337 :- दूस-यांच्या जिवितास किवा व्यक्तीगत सूरक्षिततेस धोका पोचवणारे कृत्य करून साधी दुखापत करणे 6 महिने कैद / 500 रू. दंड / दोन्ही दखलपात्र/ जामीनपात्र / तडजोडीचा 
  • कलम 338 :- दूस-यांच्या जिवास अगर व्यक्तीगत सूरक्षिततेस धोका पोचवणारे कृत्य करून मोठी दुखापत करणे 2 वर्ष कैद / 1000 रू. दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
( अन्यायाने प्रतिबंध करणे व अन्यायाने कैदेत - ठेवणे ) कलम 339 ते कलम 348
  • कलम 339 :- अन्यायाने प्रतिबंध करणे (गैरनिरोध) याची व्याख्या 
  • कलम 340 :- अन्यायाने कैदेत ठेवणे (गैरपरिरोध) याची व्याख्या
  • कलम 341 :- अन्यायाने प्रतिबंध केल्याबद्दल शिक्षा 1 महिना कैद / 500 रू.दंड / दोन्ही दखलपात्र/ जामीनपात्र / तडजोडीचा 
  • कलम 342 :- अन्यायाने कैदेत ठेवण्याबद्दल शिक्षा 1 वर्ष कैद / 1000 रू. दंड / दोन्ही दखलपात्र/ जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 343 :-3 किवा त्या पेक्षा जास्त दिवस अन्यायाने कैदेत ठेवण्याबद्दल शिक्षा 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही । दखलपात्र/ जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 348 :- एखादी गोष्ट कबुल करण्यासाठी किंवा गेलेला माल परत देणे भाग पाडण्यासाठी अन्यायाने कैदेत ठेवणे 3 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र / जामीनपात्र / बिनतडजोडीचा
( अन्यायाची बळजोरी व अंगावर जाणे ) कलम 349 ते कलम 354
  • कलम 349 :-बलप्रयोगाची (बळजोरीची) व्याख्या 
  • कलम 350 :-फौजदारीपात्र/अन्यायाच्या बळजोरीची व्याख्या कलम 351 :-अंगावर धावून जाणे किवा हमला याची व्याख्या
  • कलम 352 :-राग येण्यास मोठे कारण झाल्यावाचून अंगावर धावून जाणे किवा फौजदारीपात्र बलप्रयोग करण्याबद्दल शिक्षा 3 महिने कैद / 500रू. दंड / दोन्ही । अदखलपात्र/ जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 353 :-सरकारी नोकराला दहशत पाडुन त्याने कर्तव्य करू नये म्हणुन त्याच्या अंगावर धावुन जाणे किवा त्याच्यावर अन्यायाची बळजोरी करणे 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र/ जामीनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 354 :- एखाद्या स्त्रीचा विनयभंग करण्याच्या इाट्याने तिच्या अंगावर जाणे किवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र/ जामीनपात्र / तडजोडीचा
( मणुष्य चोरून नेणे किवा अपहरण ) कलम 359 ते कलम 366 (अ)
  • कलम 359 :- मणुष्य चोरून नेणे किवा अपनयन याची व्याख्या
  • कलम 360 :- भारतातून चोरून नेणे व्याख्या 
  • कलम 361 :- कायदेशीर पालकाच्या ताब्यातून चोरून नेणे व्याख्या 
  • कलम 362 :- पळवून नेणे किवा अपहरण याची व्याख्या 
  • कलम 363 :- पळवून नेण्याबद्दल शिक्षा 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ जामीनपात्र / बिनतडजोडीचा 
  • कलम 363(अ) :-भीक मागण्यासाठी अज्ञान व्यक्तीचे अपहरण करणे किंवा तिला अपंग बनविणे आजन्म /10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/अजामिनपात्र/बिनतडजोडीचा 
  • कलम 364 :-खून करण्यासाठी अपहरण करणे आजन्म / 10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा 
  • कलम 366 :-लग्न करण्यास वगैरे भाग पाडण्यासाठी किवा विनयभंग करण्यासाठी एखाद्या स्त्रीला पळवून नेणे 10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा 
  • कलम 366(अ):-अल्पवयीन मुलगी अनैतिक कृत्यासाठी मिळवणे 10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा 2
( लैंगिक अपराध ) कलम 375 ते कलम 377
  • कलम 375 :-बलात्काराची व्याख्या 
  • कलम 376 :-बलात्कार केल्याबद्दल शिक्षा 25.12.1983 रोजी या कलमाचे दोन भाग केले आहेत 376(1):- या पोटकलमाखाली सर्वसाधारण बलात्काराकरिता शिक्षा जन्मठेप किवा 10 वर्ष कैद परंतु सेशन कोर्टाने कमित कमी 7 वर्ष शिक्षा दिलीच पाहिजे असे बंधन आहे. दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा 376(2):-या पोटकलमाप्रमाणे 7 प्रकारचे नविन बलात्कार खालिलप्रमाणे : ग :- गर्भवती स्त्री, री :- रिमांड होम, बा :- बारावर्षाखालिल, स :- सरकारी नोकर, पो :- पोलीस सा :- सामुदायिक हो :- हॉस्पीटल ( गरिबांस पोसाहो ) सदर गुन्ह्याकरिता याच पोटकलमात शिक्षा जन्मठेप किवा 10 वर्ष कैद सांगितली आहे. परंतु कायद्याप्रमाणे सेशन कोर्टाने कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा दिलीच असे बंधन आहे. दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा मात्र बलात्कार झालेली स्त्री त्याची पत्नी असेल आणि 12 वर्षापेक्षा लहान वयाची नसेल तर त्या बबतीत त्याला 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र/ जामीनपात्र / बिनतडजोडीचा 
  • कलम 376(अ) :-फारकतीच्या कालावधीत एखाद्या पुरूषाने आपल्या पत्नशी संभोग करणे। 2 वर्ष कैद आणि दंड अदखलपात्र/ जामीनपात्र / बिनतडजोडीचा 
  • कलम 376(ब) :-लोकसेवकाने त्याच्या ताब्यातील स्त्री बरोबर संभोग करणे 5 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र( परंतु वॉरंटाशिवाय व दंडाधिकाव्याच्या आदेशाशिवाय अटक करता येणार नाही) जामीनपात्र /बिनतडजोडीचा 
  • कलम 376(क) :-कारागृह किवा बालसुधारगृहाच्या अधिक्षकाने त्याच्या ताब्यातील स्त्री बरोबर संभोग करणे 5 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र( परंतु वॉरंटाशिवाय व दंडाधिकान्याच्या आदेशाशिवाय अटक करता येणार नाही) जामीनपात्र /बिनतडजोडीचा 26
  • कलम 376(ड) :-रूग्णालयाच्या व्यवस्थापकाने किवा ईतर कर्मचा-याने रूग्णालयातील कोणत्याही स्त्रीशी संभोग करणे 5 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र( परंतु वॉरंटाशिवाय व दंडाधिकान्याच्या आदेशाशिवाय अटक करता येणार नाही) जामीनपात्र  / बिनतडजोडीचा
  • कलम 377 :- अनैसर्गिक संभोग जन्मठेप /10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
( प्रकरण 17 वे ) मालमत्तेच्या विरोधी अपराधांविषयी कलम 378 ते कलम 399
  • कलम 378 :- चोरीची व्याख्या 
  • कलम 379 :- चोरी केल्याबद्दल शिक्षा 3 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र/ अजामिनपात्र / तडजोडीचा 
  • कलम 380 :- बंद जागेत म्हणजे राहते घर , तंबुत किवा नावेत चोरी केल्याबद्दल शिक्षा 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा 27
  • कलम 381 :- कारकुनाने किवा नोकराने मालकाच्या ताब्यातील मालमत्तेची चोरी करणे 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / तडजोडीचा 
  • कलम 382 :- जीव घेण्याची किवा दूखापत करण्याची तयारी करून चोरी करणे 10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा 
  • कलम 383 :- जुलमाने घेणे किवा बलादग्रहण व्याख्या
  • कलम 390 :- जबरी चोरीची व्याख्या 
  • कलम 391 :- दरोड्याची व्याख्या 
  • कलम 392 :- जबरी चोरी बद्दल शिक्षा 10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा 
  • कलम 393 :- जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा 
  • कलम 394 :- जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे जन्मठेप / 10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 395 :- दरोडा घातल्याबद्दल शिक्षा जन्मठेप / 10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 396 :- खुनासहित दरोडा पाच किवा अधिक व्यक्तीपैकी कोणत्याही व्यक्तीने जर दरोडा घालतांना खून केला तर त्यांच्यापैकी प्रत्येक व्यक्तीला मृत्यू/आजन्म कैद /10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 399 :- दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे आजन्म कैद /10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
( मालमत्तेच्या फौजदारीपात्र अपहाराविषयी ) कलम 403 ते कलम 409
  • कलम 403 :- मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार किवा कोणत्याही जंगम मालमत्तेचा लबाडीने गैरशिस्त वापर करणे 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा 
  • कलम 404 :- एखाद्या मणुष्याजवळ मरतेवेळेस त्याच्या ताब्यात असणा-या मालमत्तेचा अप्रामाणिकपणाने अपहार 3 वर्ष कैद आणि दंड अदखलपात्र/ जामीनपात्र /बिनतडजोडीचा परंतु सदरचा अपराध मयत झालेल्या इसमाचे 29
  • कलम 376(ड) :-रूग्णालयाच्या व्यवस्थापकाने किवा ईतर कर्मचा-याने रूग्णालयातील कोणत्याही स्त्रीशी संभोग करणे 5 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र( परंतु वॉरंटाशिवाय व दंडाधिकान्याच्या आदेशाशिवाय अटक करता येणार नाही) जामीनपात्र /बिनतडजोडीचा
  • कलम 377 :- अनैसर्गिक संभोग जन्मठेप /10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
( प्रकरण 17 वे ) मालमत्तेच्या विरोधी अपराधांविषयी कलम 378 ते कलम 399
  • कलम 378 :- चोरीची व्याख्या
  • कलम 379 :- चोरी केल्याबद्दल शिक्षा 3 वर्ष कैद / दंड / दोन्ही
  • दखलपात्र/ अजामिनपात्र / तडजोडीचा
  • कलम 380 :- बंद जागेत म्हणजे राहते घर , तंबुत किवा नावेत चोरी केल्याबद्दल शिक्षा 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा 27
  • कलम 381 :- कारकुनाने किवा नोकराने मालकाच्या ताब्यातील मालमत्तेची चोरी करणे 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / तडजोडीचा
  • कलम 382 :- जीव घेण्याची किवा दूखापत करण्याची तयारी करून चोरी करणे । 10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 383 :- जुलमाने घेणे किवा बलादग्रहण व्याख्या
  • कलम 390 :- जबरी चोरीची व्याख्या
  • कलम 391 :- दरोड्याची व्याख्या
  • कलम 392 :- जबरी चोरी बद्दल शिक्षा 10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 393 :- जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 394 :- जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे जन्मठेप / 10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 395 :- दरोडा घातल्याबद्दल शिक्षा जन्मठेप / 10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 396 :- खुनासहित दरोडा पाच किवा अधिक व्यक्तीपैकी कोणत्याही व्यक्तीने जर दरोडा घालतांना खून केला तर त्यांच्यापैकी प्रत्येक व्यक्तीला मृत्यू/आजन्म कैद /10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 399 :- दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे आजन्म कैद /10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/ अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
( मालमत्तेच्या फौजदारीपात्र अपहाराविषयी ) कलम 403 ते कलम 409
  • कलम 403 :- मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार किवा कोणत्याही जंगम मालमत्तेचा लबाडीने गैरशिस्त वापर करणे 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 404 :- एखाद्या मणुष्याजवळ मरतेवेळेस त्याच्या ताब्यात असणा-या मालमत्तेचा अप्रामाणिकपणाने अपहार 3 वर्ष कैद आणि दंड अदखलपात्र/ जामीनपात्र /बिनतडजोडीचा परंतु सदरचा अपराध मयत झालेल्या इसमाचे 29 नोकराने किवा कारकुनाने केला तर 7 वर्ष कैद आणि दंड अदखलपात्र/ जामीनपात्र /बिनतडजोडीचा
  • कलम 405 :- फौजदारी पात्र न्यासभंग किवा अन्यायाने विश्वासघात करणे याची व्याख्या
  • कलम 406 :- फौजदारी पात्र न्यासभंगाबद्दल किवा अन्यायाने विश्वासघात केल्याबद्दल शिक्षा 3 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र/अजामिनपात्र/( किंमत 250 रूच्या आत असेल तर) तडजोडीचा
  • कलम 407 :- सामान नेणा-याने अन्यायाने विश्वासघात केल्याबद्दल शिक्षा 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/अजामिनपात्र/( किंमत 250 रूच्या आत असेल तर) तडजोडीचा
  • कलम 408 :- कारकुनाने किंवा नोकराने अन्यायाने विश्वासघात करणे 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/अजामिनपात्र/( किंमत 250 रूच्या आत असेल तर) तडजोडीचा
  • कलम 409 :- सरकारी नोकर , व्यापारी , मुनिम , बँक व्यावसायी किवा अभिकर्ता यांनी अन्यायाने विश्वासघात करणे आजन्म कैद किवा 10 वर्ष कैद व दंड दखलपात्र/ अजामिनपात्र  बिनतडजोडीचा
( चोरीचा माल स्विकारणेबाबत ) कलम 410 ते कलम 414
  • कलम 410 :-चोरीचा माल याची व्याख्या
  • कलम 411 :-चोरीचा माल अप्रामाणिकपणे घेण्याबद्दल शिक्षा 3 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र/अजामिनपात्र/( किंमत 250 रूच्या आत असेल तर) तडजोडीचा 
  • कलम 412 :-दरोडा घालून चोरलेला माल अप्रामाणिकपणे घेतल्याबद्दल शिक्षा आजन्म /10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र / अजामिनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 414 :-चोरीचा माल लपविण्याच्या कामात मदत करणे 3 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र/अजामिनपात्र/( किंमत 250 रूच्या आत असेल तर)
तडजोडीचा ( ठकबाजी (फसवणूक) ) कलम 415 ते कलम 420
  • कलम 415 :- ठकबाजी किवा फसवणूक याची व्याख्या
  • कलम 416 :- तोतयेगिरी करून किवा वेषांतर करून फसवणूक करणे याची व्याख्या
  • कलम 417 :- फसवणूक करण्याबद्दल शिक्षा 1 वर्ष कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 419 :- तोतयेगिरी करून किवा वेषांतर करून फसवणूक करण्याबद्दल शिक्षा 3 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 420 :- फसवणूक करून माल देण्याविषयी अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करणे 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र / अजामिनपात्र / तडजोडीचा
( नूकसान/अपक्रिया/आगळिक ) कलम 425 ते कलम 436
  • कलम 425 :- नूकसान/अपक्रिया/आगळिक याची व्याख्या
  • कलम 426 :- अपक्रिया केल्याबाबत शिक्षा 3 महिने कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 427 :- 50 रू. पेक्षा जास्त किमतीच्या मालास अपक्रिया केली तर त्यास 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 429 :- गुरेढोरे किवा 50 रूपयांच्या किंमतीचे कोणतेही जनावर जीवे मारून किवा लंगडे करून अपक्रिया करणे 5 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 430 :-पाटबंधा-याच्या कामाची खराबी करून किवा गैरपणे पाण्याची दिशा बदलून आगळिक करणे 5 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 431 :- सार्वजनिक रस्ता ,पुल,नदी किवा कालवा याची खराबी करून आगळिक करणे 5 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र /बिनतडजोडीचा
  • कलम 432 :- सार्वजनिक निचरा गटारे नूकसानकारक होईल अशाप्रकारे भरून वाहू देउन किवा त्यात अडथळा निर्माण करून आगळीक करणे 5 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र/ जामीनपात्र / बिनतडजोडीचा
  • कलम 436 :- घर वगैरे नाहिसे करण्याच्या इराद्याने विस्तवाने किवा स्फोटक पदार्थाने अपक्रिया करणे। आजन्म / 10 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र / अजामिनपात्र /बिनतडजोडीचा
( फौजदारीपात्र अतिक्रमण ) कलम 441 ते कलम 461
  • कलम 441 :- फौजदारीपात्र अतिक्रमण व्याख्या
  • कलम 442 :- गृह अतिक्रमण करणे व्याख्या
  • कलम 443 :- चोरटे गृह अतिक्रमण करणे व्याख्या
  • कलम 444 :- रात्रीच्या वेळी चोरटे गृह अतिक्रमण करणे व्याख्या
  • कलम 445 :- घरफोडीची व्याख्या 34
  • कलम 446 :- रात्रीच्या वेळी घरफोडी करणे याची व्याख्या
  • कलम 447 :- फौजदारीपात्र अतिक्रमणाबद्दल शिक्षा 3 महिने कैद / 500 रू. दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 448 :- गृह अतिक्रमणाबद्दल शिक्षा 1 वर्ष कैद / 1000रू. दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 451 :- ज्या अपराधाला कैदेची शिक्षा सांगितली आहे असा अपराध करण्याकरता गृह अतिक्रमण करणे 2 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र/(चोरीचा)अजामिनपात्र/तडजोडीचा अपराध करण्याचा उद्देश चोरी असेल तर 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र / अजामिनपात्र /बिनतडजोडीचा
  • कलम 453 :- चोरट्या गृह अतिक्रमणाबद्दल किवा घरफोडीबद्दल शिक्षा 2 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र / अजामिनपात्र /बिनतडजोडीचा
  • कलम 457 :- ज्या अपराधाबद्दल कैदेची शिक्षा सांगितली आहे तो अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी चोरटे गृहअतिक्रमण किवा घरफोडी 5 वर्षा पर्यंत कैद आणि दंड 35 दखलपात्र / अजामिनपात्र /बिनतडजोडीचा आणि अपराध चोरीचा असेल तर 14 वर्ष कैद दखलपात्र / अजामिनपात्र /बिनतडजोडीचा
  • कलम 458 :- दूखापत करण्याची , हमला करण्याची किवा अन्यायाने प्रतिबंध करण्याची पूर्वतयारी करून नंतर रात्रीच्या वेळी चोरटे गृहअतिक्रमण किवा घरफोडी 14 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र / अजामिनपात्र /बिनतडजोडीचा
  • कलम 461 :- आतमध्ये मालमत्ता असलेले पात्र अप्रामाणिकपणाने फोडून उघडणे 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र  अजामिनपात्र /बिनतडजोडीचा
( प्रकरण 18 वे ) दस्तऐवज व मालावरील निशाण्या यासंबंधिचे अपराध कलम 463,471,477(अ)
  • कलम 463 :- बनावटीकरण किवा बनावट दस्तऐवज तयार करणे याची व्याख्या 36
  • कलम 471 :- बनावट दस्तऐवज खरा म्हणुन त्याचा उपयोग करणे 7 वर्ष कैद आणि दंड दखलपात्र / जामिनपात्र /बिनतडजोडीचा
  • कलम 477(अ):- खोटे हिशोब तयार करणे 7 वर्ष कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र / जामीनपात्र /बिनतडजोडीचा
( प्रकरण 20 वे ) विवाहासंबंधीचे अपराध
  • कलम 494 :- नवरा अगर बायको जिवंत असतांना पुन्हा विवाह करणे 7 वर्ष कैद आणि दंड अदखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 497 :- परगमन / जारकर्म 5 वर्ष कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 498 :-अन्याय करण्याच्या इराद्याने विवाहित स्त्रीस फूस लावून नेणे किवा अटकावून ठेवणे 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 498(अ):- एखाद्या स्त्रीच्या पतीने अगर पतीच्या नातेवाइकाने त्या स्त्रीला क्रूर वागणुक देणे 3 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / अजामिनपात्र /बिनतडजोडीचा
( प्रकरण 22 वे ) अन्यायाची धमकी,अपमान,त्रासासंबंधी कलम 504, 506 , 509
  • कलम 504 :- शांतता भंग करण्याच्या इराश्याने अपमान करणे 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 506 :- अन्यायाची धमकी देणे किवा फौजदारीपात्र धाकदपटशाबद्दल शिक्षा 2 वर्ष कैद / दंड / दोन्ही अदखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा आणि मृत्यू किवा जबर दुखापत (करण्याची ) घडवून आणण्याची धमकी असेल तर 7 वर्ष कैद आणि दंड अदखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
  • कलम 509 :- एखाद्या स्त्रीचा विनयभंग व्हावा या इराद्याने वाईट शब्द उच्चारणे किवा हावभाव करणे 1 वर्ष कैद / दंड / दोन्ही दखलपात्र / जामीनपात्र / तडजोडीचा
( प्रकरण 23 वे ) अपराध करण्याच्या प्रयत्नाविषयी
  • कलम 511 :-आजन्म कारावासाच्या किवा अन्य कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले अपराध करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा
फौजदारी प्रक्रीया संहिता 1973
  • कलम 2 :- व्याख्या
  • क :- दखलपात्र अपराध
  • ड :- फिर्याद
  • इ :- उच्च न्यायालय
  • ग :- चौकशी
  • ह :- तपास
  • के :- महानगर क्षेत्र
  • ओ :- पोलीस ठाणे अंमलदार
  • आर :- पोलीस अहवाल
  • यु :- सरकारी अभियोक्ता
  • डब्लू :- समन्स खटला 
  • एक्स :- वॉरंट खटला
  • कलम 6 :- फौजदारी न्यायालयांचे वर्ग
  • कलम 7:- प्रादेशिक विभाग
  • कलम 8 :- महानगर क्षेत्र
  • कलम 9 :- सत्र न्यायालय
  • कलम 11 :- मॅजीस्ट्रेट न्यायालयाची स्थापना
  • कलम 21 :- विषेश कार्यकारी दंडाधिकारी
  • कलम 36 :- वरिष्ठ पोलीस अधिका-यांचे अधिकार अटकेसंबंधी कलमे
कलम 41 ते 58
  • कलम 41 :- पोलीसांना वॉरंटाशिवाय अटक करण्याचा अधिकार
  • कलम 42 :- नाव, गाव, व राहण्याचे ठिकाण सांगण्यास नकार दिल्यास अटक
  • कलम 46 :- अटक कशी करावी ?
  • कलम 47 :- ज्या इसमास अटक करावयाची आहे तो ज्या जागेत शिरलेला आहे त्या जागेची झडती
  • कलम 50 :- अटक केलेल्या इसमास अटक करण्याचे कारण व जामिनाच्या हक्काविषयी सांगणे
  • कलम 51 :- अटक केलेल्या इसमाची अंगझडती
  • कलम 52 :- अटक केलेल्या व्यक्तीजवळ असलेली घातक शस्त्रे जप्त करण्याचा अधिकार
  • कलम 53 :- पोलीसांच्या विनंतीवरून डॉक्टरने आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे
  • कलम 54 :- अटक केलेल्या इसमाच्या विनंतीवरून त्या। इसमाची वैद्यकीय अधिका-याकडून तपासणी
  • कलम 57 :- अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासांपेक्षा जास्त काळ अटकेत ठेवू नये
  • कलम 58 :- कोणा व्यक्तीला अटक केली असता त्याच्या अटकेचे वृत्त जिल्हा दंडाधिकारी यांना कळवणे
समन्स व वॉरंट बजावण्याच्या पध्दती कलमे 61 ते 69
  • कलम 61 :- समन्सचा नमुना
  • कलम 62 :- समन्स कसे बजवावे?
  • कलम 63 :- निगम ,सोसायटी ,सहकारी मंडळाातील इसम यांचेवर समन्स बजावणी
  • कलम 64 :- समन्स काढलेली व्यक्ती सापडली नाही तर समन्स कसे बजवावे
  • कलम 65 :- कलम 62,63,64 प्रमाणे समन्सची बजावणी होत नसेल तेव्हा समन्सची बजावणी
  • कलम 66 :- सरकारी नोकरावर समन्सची बजावणी
  • कलम 67 :- स्थानिक मर्यादेबाहेर समन्सची बजावणी
  • कलम 68 :- समन्स बजावणारी व्यक्ती हजर नसेल तेव्हा बजावणीचा पुरावा
  • कलम 69 :- पोस्टाने समन्सची बजावणी
वॉरंटासंबंधी कलमे कलमे 70 ते 81
  • कलम 70 :- अटक वॉरंट नमुना ,पध्दत व कालावधी
  • कलम 71 :- जामिन घेण्याविषयी वॉरंट
  • कलम 72 :- वॉरंट कोणास देता येते
  • कलम 73 :- विशिष्ठ परिस्थितीत वॉरंट कोणालाही देता येते
  • कलम 74 :- पोलीस अधिका-यांना दिलेले वॉरंट
  • कलम 75 :- वॉरंटातील सारांश जाहीर करणे
  • कलम 76 :- अटक केलेल्या व्यक्तीला विनाविलंब न्याया लया पुढे आणावे
  • कलम 77 :- भारतात कोणत्याही ठिकाणी वॉरंटची अंमल बजावणी
  • कलम 78 :- अधिकार क्षेत्राबाहेर वॉरंटची बजावणी
  • कलम 79 :- अधिकार क्षेत्राबाहेर बजावण्यासाठी पोलीस अंमलदाराच्या नावाने काढलेले वॉरंट
  • कलम 80 :- वॉरंट काढलेल्या व्यक्तीला हद्दीबाहेर अटक केल्यानंतर हजर करण्याची पध्दत
  • कलम 81 :- अटक केलेल्या आरोपीला मॅजीस्ट्रेट , cp, sp यांच्यापुढे हजर केल्यानंतरची प्रक्रिया
जाहीरनामा व जप्ती कलमे 82 ते 86
  • कलम 82 :- फरारी झालेल्या इसमावर जाहीरनामा
  • कलम 83 :- फरारी व्यक्तीच्या मालमत्तेवर जप्ती आणणे
  • कलम 84 :- हरकतदाराकडून हक्क मागण्या व जप्तीला हरकती
  • कलम 85 :- जप्त केलेली मालमत्ता मूक्त करणे , विकणे, परत करणे
  • कलम 86 :- जप्त केलेली मालमत्ता परत करण्याच्या अर्जाच्या नामंजुरीवरील अपील समन्स व वॉरंटबाबत इतर नियम
  • कलम 87 :- समन्स ऐवजी किवा त्या ऐवजी आणखी वॉरंट काढणे
  • कलम 88 :-उपस्थितीसाठी जामिन लिहून घेण्याचा अधिकार
  • कलम 89 :–उपस्थितीसाठी दिलेल्या जामिनाचा भंग केल्यास अटक माल हजर करण्याविषयी समन्स
  • कलम 91 :- दस्तएवज किवा इतर वस्तू हजर करणेसाठी समन्स
  • कलम 92 :-पोस्टातील पत्रे ,तारा वगैरे मिळवण्यासाठीची प्रकिया CR झडती वॉरंट
  • कलम 93 :- झडती घेण्याचे वॉरंट केव्हा काढता येते
  • कलम 94 :- ज्या जागेत चोरीचा माल , बनावट दस्तऐवज वगैरे असल्याचा संशय आहे त्या जागेची झडती
  • कलम 95 :- विवक्षित प्रकाशने जप्त करण्याचा , घोषित करण्याचा व त्या संबंधाने झडती घेण्याचे वॉरंट काढण्याचा अधिकार
  • कलम 96 :- जप्तीची घोषणा रद्द करण्याकरता उच्च न्याया लयात अर्ज
  • कलम 97 :- अन्यायाने कैदेत ठेवलेल्या व्यक्तींना शोधून काढण्यासाठी झडती
  • कलम 98 :- पळवून नेलेल्या स्त्रीस परत देण्यास भाग पाडण्याचा अधिकार
  • कलम 100 :- बंदिस्त जागेची झडती घेण्याची पध्दत
  • कलम 102 :- चोरीची मालमत्ता ताब्यात घेण्याचा पोलीस अधिका-याचा अधिकार शांतता राखण्यासाठी व चांगल्या वागणुकीसाठी जामीन
  • कलम 107 :–अन्य प्रकरणी शांतता राखणेसाठी जामीन
  • कलम 109 :-संशयित व्यक्तीकडून चांगल्या वागणुकीसाठी जामीन
  • कलम 110 :-साराईत अपराध्याकडून चांगल्या वागणुकी साठी जामीन
सार्वजनिक सुव्यवस्था व स्वस्थपणा राखणेबाबत कलमे 129,144,145
  • कलम 129 :- जमाव पांगवण्यासाठी बिनलष्करी बळाचा उपयोग
  • कलम 144 :- उपद्रवाच्या किवा धास्ती वाटणा-या धोक्या संबंधी अशा तातडीच्या प्रकरणात एकदम हूकूम काढण्याचा अधिकार (संचारबंदी तरतूद)
  • कलम 145 :- जमिन किवा पाणी या संबंधीच्या तंट्यामुळे शांतता भंग घडून येण्याचा संभव असतो त्या बाबतीतील प्रक्रीया
पोलीसांची प्रतिबंधात्मक कारवाई कलमे 149 ते 153
  • कलम 149 :- पोलीसांनी दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करणे
  • कलम 150 :- दखलपात्र अपराध करण्याची तयारी , खबर देणे
  • कलम 151 :- दखलपात्र अपराध करण्यास प्रतिबंध करण्या साठी मॅजीस्ट्रेटच्या आदेशाशिवाय अटक करण्याचा पोलीसांचा अधिकार
  • कलम 152 :- सार्वजनिक मालमत्तेला नूकसान पोचवण्यास प्रतिबंध करण्याचा पोलीसांचा अधिकार
  • कलम 153 :- खोटी वजने व मापे यांची तपासणी करण्याचा अधिकार
पोलीसांना खबर देणे आणि तपास करण्याचे अधिकार कलमे 154 ते 176
  • कलम 154 :- दखलपात्र अपराधाची खबर
  • कलम 155 :- अदखलपात्र अपराधाची खबर व तपास
  • कलम 156 :- दखलपात्र अपराधाचा तपास करण्याचा अधिकार
  • कलम 157 :- तपासाची प्रक्रिया
  • कलम 158 :- रिपोर्ट सादर करण्याची पध्दत
  • कलम 159 :- तपास किवा प्रारंभिक चौकशी करण्याचा अधिकार
  • कलम 160 :- साक्षीदारांना बोलवण्याचा तपासी अंमलदाराचा अधिकार
  • कलम 161 :- पोलीसांनी साक्षीदारांची जबानी घेणेबाबत
  • कलम 162 :- पोलीसांना सांगितलेल्या निवेदनावर(जबाब) सही करावयाची नाही व अशा जबाबाचा पुरव्यात उपयोग
  • कलम 163 :- कोणतेही प्रलोभन दाखवायचे नाही
  • कलम 164 :- कबुलीजबाब व निवेदन लिहून घेणे
  • कलम 165 :- वॉरंटवाचून पोलीस अधिका-याने घ्यावयाची झडती
  • कलम 166 :- एखादा पोलीस अंमलदार दुस-या पोलीस अंमलदारास झडती बद्दल वॉरंट काढण्याची मागणी करू शकतो
  • कलम 167 :- जेव्हा तपास 24 तासांत संपवणे शक्य नसेल तेव्हा वापरायची कार्यपध्दती
  • कलम 168 :- कनिष्ठ पोलीस अधिका-याने तपासाचा अहवाल वरिष्ठांना देणे
  • कलम 169 :- जेव्हा पुरेसा पुरावा नसेल तेव्हा आरोपीस सोडून देणे
  • कलम 170 :- जेव्हा पुरेसा पुरावा असेल तेव्हा खटला कोर्टात पाठवणे
  • कलम 171 :- फिर्यादी व साक्षीदार यांना पोलीस अंमलदारा बरोबर पाठवू नये व त्यांच्यावर निर्बध लादता कामा नये
  • कलम 172 :- खटल्यातील तपासाच्या कार्यवाहीचा रोजनामा ( केसडायरी )
  • कलम 173 :- तपास पूर्ण झाल्यावर अंतिम अहवाल ( चार्जशीट )
  • कलम 174 :- आत्माहत्या अगर अनैसर्गिक मृत्यूबाबत पोलीसांनी करावयाची चौकशी
  • कलम 175 :- व्यक्तींना समन्स पाठवण्याचा अधिकार
  • कलम 176 :- मृत्यूच्या कारणाची दंडाधिका-याने चौकशी करणे
जामिन व मुचलके याविषयी ठराव कलमे 436, 437, 438
  • कलम 436 :- कोणत्या प्रकरणात जामीन घ्यावयाचा
  • कलम 437 :- अ—जामिनपात्र अपराधाबाबत केव्हा जामीन घेण्याचा अधिकार आहे
  • कलम 438 :- अटकेची आशंका वाटणा-या व्यक्तीला जामीन मंजूर करण्याविषयी निदेश



Comments