महर्षी वि. रा. शिंदे (१८७३-१९४४)

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रील १८७३ रोजी जमखिंडी, जि. विजापूर, कर्नाटक येथे झाला. 
  • 0 महर्षी वि.रा.शिंदे यांचा मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. फर्गुसन कॉलेजमध्ये त्यांनी बी ए ची पदवी मिळविली. 
  • 0 महर्षी शिंदे यांना डेक्कन मराठा एज्युकेशन असोशिएशनने शिक्षणाकरीता दरमहा १० रु दिले. 
  • 0 १९०१ मध्ये मुंबईतील प्रार्थना समाज व कलकत्यातील ब्राम्हो समाज यांच्या साह्याने इंग्लंड मधील मॅनचेस्टर येथे धर्म शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ते गेले. 
  • 0 १९०५ साली महर्षी शिंदे यांनी पुणे येथे अस्पृश्य मुलांसाठी रात्रशाळा सुरु केल्या. 
  • 0 १६ ऑक्टोंबर १९०६ वि रा शिंदे यांनी अस्पृश्यतेचे निर्मुलन करण्यासाठी "ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशन" ची स्थापना केली. 
  • 0 महर्षी वि. रा. शिंदे जॉन स्टुअर्ट मिल या लेखकाच्या ऑन लिबर्टी व सबजेक्ट ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव होता. 
  • 0 २५ मे १९१६ रोजी पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत गुन्हेगार जातीची सुधारणा या विषयावर त्यांनी चर्चासत्र चालविले होते. 
  • 0 १९११ मध्ये मुरळी सोडण्याच्या पद्धतीचे विरोधामध्ये त्यांनी प्रतिबंधक परीषद बोलावली. महर्षी शिंदे यांनी मुरळी सोडणे या प्रथेचा विरोध केला. 
  • 0 १९१७ मध्ये कलकत्ता येथे राष्ट्रीय सभेचे पार पडलेल्या अधिवेशनाच्या पहिल्या महीला अध्यक्ष म्हणुन अॅनी बेझंट यांची निवड झाली. या अधिवेशनामध्ये "अस्पृश्यता पाळु नये" असा ठराव पास करुन घेण्यामध्ये शिंदे याचे मोलाचे योगदान आहे. 
  • 0 १९२० मध्ये नागपुर येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परीषद बोलावली. 
  • महर्षी वि. रा. शिंदे यांची ग्रंथ संपदा :- 
  • १) अनटचेबल इंडिया
  • ४) मराठी भाषीक व कानडी भाषीक संबंध लेख 
  • २) भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न - १९३३
  • ५) भागवत धर्माचा विकास हा महत्वपुर्ण लेख 
  • 6) माझ्या आठवणी व अनुभव (आत्मचरित्र्य)