महात्मा ज्योतीबा फुले (१८२७-१८९०)


  • महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म ११ एप्रील १८२७ (११ एप्रील - राष्ट्रीय शिक्षक हक्क दिन) रोजी पुण्यामध्ये झाला. त्यांचे मुळगाव सातारा जिल्हयातील "कटगुण" हे होते. 
  • महात्मा फुले यांचे मुळ नाव ज्योतीबा गोविंदराव फुले हे होते. त्यांच्या आईचे नाव "चिमणाबाई" होते तर आजोबांचे नाव "शेरीबा" हे होते. ज्योतीबा हे ०१ वर्षाचे असताना त्यांच्या आईचा मृत्यु झाला नंतर ज्योतीबांचा संभाळ त्यांची आत्या "सगुनाबाई" यांनी केला. 
  • ज्योतीबांचे मुळ आडनाव "गोव्हे" हे होते. ज्योतीबांच्या आजोबांचा फुलांचा व्यवसाय होता. कालांतराने त्यांचे फुल व्यवसायाहुन फुले असे झाले. ज्योतीबा हे जातीने क्षत्रीय माळी समाजाचे होते. 
  • सार्वजनिक काका व रा. गो. भंडारकर हे ज्योतीबा फुलेंचे वर्ग मित्र होते. 
  • १८३४ ते १८३८ मध्ये ज्योतीबांनी प्राथमिक शिक्षण पंतोजींच्या मराठी शाळेत घेतले. ज्योतीबा फुल्यांच्या वडीलांच्या कारकुनामुळे ज्योतीबांस शिक्षणापासुन वंचीत रहावे लागले. 
  • १८४० मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह सातारा जिल्हयातील धनकवडीच्या खंडोजी सिंधुजी नेवसे (झगडे पाटील) यांची कन्या "सावित्रीबाई" यांच्याशी झाला. 
  • सावित्रीबाई फुले यांचा जन्म ०३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हयातील "नायगाव" येथे झाला. ०३ जानेवारी हा दिवस राज्यामध्ये "राज्य स्त्री मुक्ती दिन" म्हणून साजरा केला जातो. 
  • महत्वाचे :- ०३ जानेवारी २००४ रोजी महाराष्ट्र सरकारने सावीत्रीबाई फुले यांचे नायगाव जि. सातारा येथील घर "राष्ट्रीय स्मारक" म्हणुन घोषीत केले आहे. सावित्रीबाई फुले या देशातील पहील्या शिक्षीका व पहील्या मुख्याध्यापिका होत. 
  • महात्मा फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. सावित्रीवाई यांचे शिक्षण "नॉर्मल स्कुल" या शाळेत झाले. त्यांचे शिक्षक "यशवंतराव परांजपे" हे होते. 
  • सावित्रीबाई फुले यांनी १८५४ मध्ये "काव्यफुले' तर १८९२ मध्ये "बावनकशी" व "सुबोध रत्नाकर" हे काव्यसंग्रह लिहीले. 
  • ज्योतीबांची चिंतन शिलता व बौद्धीक कौशल्य पाहुन शेजारी राहणारे ऊर्द शिक्षक गफार बेग मुन्सी व धर्मोपदेशक लिजीट साहेब यांच्या प्रयत्नाने ज्योतींबाना खाजगी स्कॉटीश मिशनीरीच्या शाळेत प्रवेश घेतला. संस्कृत, व्याकरण, ज्योतीष, विज्ञान, धर्मशास्त्र इ. विषयांचा अभ्यास ज्योतीबांनी या शाळेत केला. या शाळेतच ज्योतीबांची मैत्री सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राम्हण मुलाशी झाली. 
  • फुले बंडखोर वृत्तीचे होते. त्यांना राजकीय व सामाजिक गुलामगिरी बद्दल चिड होती. इंग्रजांचे राज्य उलथवून टाकण्याच्या उद्देशाने १८४७ मध्ये ज्योतीबांनी लहुजी उस्ताद मांग-साळवे या पैहलवानाकडुन नेमबाजी व दांडपट्टयाचे प्रशिक्षण घेतले होते. पंरतु लवकर आपल्या विचारातील फोलपणा त्यांना दिसुन आला. 
  • फुले यांच्यावर संस्कृत मधील वज्रसुची व कबीरांच्या "विप्रमती" या ग्रंथातील काही भागांचा प्रभाव होता.
  • संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज व मार्टीग ल्युथर किंग यांच्या पासुन अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी घेतली. 
  • १८४७ मध्ये "थॉमस पेन" यांच्या "राईट्स ऑफ मॅन" या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. थॉमस पेन याची इतर पुस्तके - जस्टीस अॅन्ड ह्युम्यानिटी, कॉमनसेन्स, एज ऑफ रिजन व राईट्स ऑफ मॅन.
  • १८४८ मध्ये ब्राम्हण मित्राच्या वरातीमध्ये एका माळ्याचा मुलगा म्हणुन ब्राम्हणांनी त्यांचा अपमान केला होता. हा प्रसंग त्यांच्या जिवनास कलाटणी देणारा ठरला. 
  • ०३ ऑगस्ट १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठ मधील भिड्यांच्या वाड्यात ज्योतीबांनी देशातील पहीली मुलींची शाळा सुरु केली. स्वतंत्रपणे मुलींची शाळा सुरु करणारे ज्योतीबा हे पहीले समाजसुधारक होते. मुलींच्या शाळेच्या स्थापनेच्या प्रेरणा अहमदनगरच्या स्कॉटीश शाळेच्या शिक्षीका "मिस फरार" यांच्या कडुन ज्योतीबांनी घेतली. 
  • ०३ जुलै १८५१ रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठ मध्ये आण्णासाहेब चिपळुणकर यांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरु केली. १७ सप्टेंबर १८५१ रोजी पुण्यातील रास्ता पेठ येथे मुलींची तिसरी शाळा ज्योतीबांनी सुरु केली. १५ मार्च १८५२ रोजी वेताळ पेठ मध्ये मुलींची चौथी शाळा ज्योतीबांनी सुरु केली. 
  • महत्वाचे :- १९ मे १८५२ रोजी पुण्यातील "वेताळ पेठ" येथे ज्योतीबानी अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी पहीली शाळा सुरु केली. 
  • १७ सप्टेंबर १८५२ रोजी ज्योतीबा फुले यांनी पुण्यात लायब्ररीची स्थापना केली. 
  • १६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुणे महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य थॉमस कॅन्डी यांनी ब्रिटीश सरकारचे वतीने पुण्यातील विश्रामबाग वाड्यात ज्योतीबांचा विशेष सत्कार केला. 
  • १० सप्टेंबर १८५३ रोजी "महार, मांग, चांबार इ. लोकांस विद्या शिकविणारी मंडळी" या नावाची संस्था ज्योतीबांनी सुरु केली. लोकांना शिकविण्याकरीता शिक्षक उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सदरची संस्था चालु करण्यात आली होती. या संस्थेमार्फत १८५८ पर्यंत ०३ शाळा स्थापन करण्यात आल्या. 
  • ब्रिटीशांनी फुलेंच्या स्त्री शिक्षणासाठी "दक्षिणा प्राईज फंड" च्या साह्याने दरमहा २५ रु प्रमाणे मदत केली. 
  • १८५४ मध्ये ज्योतीबांनी स्कॉटीश मिशनरी शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली. 
  • महत्वाचे :- १८५५ मध्ये भारतातील पहीली "पौढांसाठीची रात्र शाळा" ज्योतीबांनी पुण्यात सुरु केली 
  • १८५५ मध्ये ज्योतीबांनी "तृतीय रत्न" हे नाटक लिहीले. ब्राम्हण लोक शुद्रांची कशी फसवणुक करतात हे त्यांनी सप्रमाण या नाटकातुन दाखवुन दिले. 
  • ०८ मार्च १८६० रोजी पुण्यात ज्योतीबांनी पहीला पुर्नविवाह घडवुन आणला. 
  • १८६३ मध्ये ज्योतीबा फुलेंनी स्वतःच्या घरीच भारतातील पहीले "बालहत्या प्रतिबंधक गृह" स्थापन केले व नंतर पंढरपुर येथेही ज्योतीबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. 
  • निपुत्रीक असताना देखील दुसरे लग्न न करता फुलेंनी बाल हत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई ब्राम्हण विद्धवेचा "यशवंत" हा मुलगा दत्तक घेतला व त्याला डॉक्टर केले. 
  • १८६४ मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेत "शेरवी" जातीतला "पहीला विधवा पुर्नविवाह" ज्योतीबांनी घडवुन आणला. 
  • १८६५ मध्ये देशातील विधवांच्या केस रोपनाच्या प्रथेला विरोध करण्याकरीता ज्योतीबांनी पुण्यातील "तळेगाव ढमढेरे" व "ओतुर" येथे "न्हावीकांचा संप" घडवुन आणला. 
  • १८६७ मध्ये रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार करण्याचे महत्वपुर्ण काम ज्योतीबांनी केले. 
  • ज्योतीबांच्या कार्यामुळे सनातनी लोकांनी त्यांना मारण्याकरीता शेंडे व कुंभार या मारेक-यांना पाठविले होते। पंरतु तेच मारेकरी नंतर फुल्यांचे अनुयायी बनले. 
  • १८६८ मध्ये अस्पृश्यांसाठी ज्योतीबांनी त्यांचे घरातील पाण्याचा हौद खूला केला.
  • १८६९ मध्ये "छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा" ज्योतीबांनी रचला व त्यामध्ये ज्योतीबांनी स्वतःला "कुळवाडी भुषण" ही उपमा त्यांनी दिली. 
  • १८६९ मध्ये "ब्राम्हणांचे कसब" हा काव्यत्मक ग्रंथ ज्योतीबांनी लिहीला. 
  • २४ सप्टेंबर १८७३ रोजी ज्योतीबांनी पुणे येथे "सत्यशोधक समाज" या संस्थेची स्थापना केली. "सर्व साक्ष जगत्पती त्याला नकोची मध्यस्थी" हे सत्यशोधक समाजाचे ब्रिद वाक्य होते. 
  • १८७३ मध्ये ज्योतीबांनी सत्यशोधक समाज मार्फत अस्पृशांच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला. 0 १८७३ मध्ये राधाबाई निंबाळकर व सिताराम अल्हाट यांचा सत्यशोधक समाज पद्धतीने विवाह घडवुन आणला. 
  • १८७३ मध्ये ज्योतीबांनी "गुलामगिरी" हा ग्रंथ लिहुन तो अमेरीकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाच्या निग्रो वंशीयांना / काळ्या लोकांना तो अर्पण केला. महाराष्ट्रामध्ये फुले यांनी ब्राम्हणेत्तर चळवळीचा पाया घातला. सत्यशोधक समाज मार्फत "दिनबंधु"हे वृत्तपत्र ०१ जोनवारी १८७७ रोजी ज्योतीबांनी सुरु केले. या वृत्तपत्राचे संपादक कृष्णराव भालेकर हे होते. १८८० साली हे वृत्तपत्र नारायण लोखंडे यांच्याकडे देण्यात आले. 
  • १८७५ मध्ये पुण्यातील जुन्नर व अहमदनगर या भागात शेतक-यांसाठी ज्योतीबांनी "खत फोडीचे आंदोलन केले. सदरचे आंदोलन ०२ वर्षे चालले. 
  • १८७६ ते १८८२ दरम्यान ज्योतीबा फुले हे पुणे नगर पालिकेचे सदस्य होते. या काळातच ज्योतीबांनी सामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी ब्रिटीश शासनासमोर प्रश्न मांडले. 
  • ज्योतीबा फुले यांनी हरी शिंदे, कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने फुल्यांनी "कमर्शिल अँड कॉन्ट्रॅक्टिंग" ही बांधकाम कंपनी सुरु केली. पुण्यातील खडवासला धरण बांधण्यामध्ये या कंपनीचा मोलाचा वाटा होता. 
  • १८७७ मध्ये देशात पडलेल्या दुष्काळादरम्यान पुण्यातील  "धनकवडी" येथे ज्योतीबांनी विद्यार्थ्यांसाठी कॅप सुरु केला. 
  • १८८२ साली भारतामध्ये शिक्षणासंबंधी आलेल्या हंटर कमिशन पुढे महात्मा फुले यांनी साक्ष दिली. भारतातील शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटीश शासनाने हे कमीशन नेमले होते. हंटर कमिशन समोरील साक्ष देतेवेळी १२ वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीने द्यावे अशी मागणी ज्योतीबा फुले यांनी केली. 
  • पंडीता रमाबाई व लेले शास्त्री यांनी धर्मांतर करु नये म्हणुन ज्योतीबांनी प्रयत्न केले. 
  • २५ सप्टेंबर १८८४ साली रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांनी "मिल्स हॅन्ड असोसिएशन" ही भारतातील पहीली कामगार संघटना ज्योतीबांच्या मदतीने स्थापन केली. 
  • ०२ मार्च १८८८ रोजी व्हिक्टोरिया राणीचे पुत्र "ड्युक ऑफ कॅनॉट" हा भारत भेटीवर आला होता. भारतीय शेतक-याची अवस्था ब्रिटीशांना समजावून सांगण्याकरीता ज्योतींबानी पुण्यामध्ये शेतक-याच्या वेशामध्ये त्यांचे स्वागत केले. 
  • ११ मे १८८८ रोजी मुंबई येथील "कोळीवाडा (मांडवी) " या समारंभामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहाद्दर वडेकर यांनी फुले यांना "महात्मा" ही पदवी दिली. 
  • १९ जुलै १८८७ रोजी ज्योतीबांनी स्वतःचे मृत्युपत्र लिहीले. 
  • १८८९ मध्ये मुंबई अधिवेशनात शेतक-यांना राष्ट्रीय सभेमध्ये स्थान नसल्याने "राष्ट्रीय सभेमध्ये जो पर्यंत शेतक-यांना जागा मिळत नाही, तो पर्यंत राष्ट्रीय सभेस राष्ट्रीय म्हणुन घेण्याचा अधिकार नाही" असे उद्गार ज्योतीबांनी काढले. 
  • २८ नोव्हेंबर १८९० रोजी ज्योतीबा फुले यांचा मृत्यु पुणे येथे झाला.
  • मुंबईचे गव्हर्नर व्हायकाऊंट फॉकलंड यांनी १८५२ साली ज्योतीबा फुले यांच्या शाळेस मासीक ७५ रु अनुदान मंजुर केले. तसेच ब्रिटीश काळात "दक्षिणा प्राईज फंडाद्वारे" ब्रिटीशांनी फुल्यांच्या स्त्री शिक्षणास दर महा २५ रु मदत केली. 
  • "वेदाचार" हे पुस्तक लिहीणारे धोंडीराम कुंभार यांनी प्रथम फुल्यांवर हल्ला केला व नंतर ते ज्योतीबांचे अनुयायी बनले. 
  • १९२५ मध्ये पुणे नगर पालिकेचे सदस्य केशवराव जेधे यांनी महात्मा फुले यांचा पुतळा पुणे नगर पालिकेने बसवावा अशी प्रथम मागणी 
  • महत्वाचे :- ०३ डिसेंबर २००३ रोजी संसदेच्या प्रांगणामध्ये महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण करण्यात आले आहे. 
  • १८८२ मध्ये ताराबाई शिंदे यांनी "स्त्री-पुरुष तुलना" हा ग्रंथ लिहीला. ताराबाईंच्या या ग्रंथातील विचारांना फुल्यांनी पाठींबा दर्शविला होता. 
  • महात्मा फुले यांनी काव्यात्मक लेखन करताना ओव्यांना अभंग ऐवजी "अखंड" हे नाव दिले. 
  • ज्योतीबा फुले यांना समाजातील ब्राम्हणवादी लोकांकडुन कलंक कसाई व ग्राम राक्षक असे संबोधले जाई. ज्योतीबा फुले यांची ग्रंथ संपदा :- 
  1. १८५५ मध्ये "तृतीय रत्न" नाटक ब्राम्हण लोक कनिष्ठांना कसे फसवितात व ख्रिस्ती धर्म उपदेशक हे त्यांच्या अनुयायांना कसे सत्यमार्ग दाखवितात हे त्यांनी निदर्शनास आणले. 
  2. १८६८ मध्ये "ब्राम्हणांचे कसब" हा काव्यत्मक ग्रंथ लिहीला. या ग्रंथाची प्रस्तावना बाबा पद्मजी यांनी केली. 
  3. १८६९ मध्ये छत्रतपी शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा लिहीला. यामध्ये ज्योतीबांनी स्वतःला "कुळवाडी भुषण' ही पदवी दिली आहे. 
  4. १८७३ मध्ये ज्योतीबांनी "गुलामगिरी" हा ग्रंथ प्रश्नोत्तर स्वरुपात लिहीला व तो अमेरीकेतील काळ्यालोकाना अर्पण केला. 
  5. १८८३ मध्ये त्यांनी "शेतक-यांचे आसुड"हा ग्रंथ लिहुण शेतक-यांच्या दुखःस वाचा फोडली. याच "विद्येविना मती गेली; मती विना नीती गेली; नीतीविना गती गेली; गतीविना वित्त गेले; वित्त विना क्षुद्र खचले; इतके अनर्थ एका अविद्येने केले" या महत्वपुर्ण ओव्या ज्योतीबांनी शेतक-यांचे आसुड या ग्रंथात लिहुन शेतक-यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. 
  6. १८८३ मध्ये ज्योतीबांनी "अस्पृश्यांची कैफीयत" हा ग्रंथ लिहीला. 
  7. १८८५ मध्ये ज्योतीबांनी "इशारा" या पुस्तकात जातीभेद बाबतचे विचार मांडण्यात आले होते. 
  8. १३ जुन १८८५ रोजी ज्योतीबांनी "सत्सार" हे मासीक सुरु केले. या नियतकालीकातुन ब्राम्होसमाज व प्रार्थना समाजावर टिका करण्यात आली होती. 
  9. १८९१ मध्ये "सार्वजनिक सत्यधर्म" हा ग्रंथ ज्योतीबांच्या मृत्यू नंतर प्रकाशित झाला आहे. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा हेतु या ग्रंथामध्ये प्रतिपादीत केला आहे. तसेच या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी अर्थ सहाय्य केले. सत्यशोधक समाज संस्थेचे विचार "दीन बंधु" या साप्ताहीक मधुन व्यक्त केले जाई. सार्वजनिक सत्यधर्म हा "विश्व कुंटुबाचा जाहीरनामा" असे लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हणटले आहे. या ग्रंथास "सत्यशोधक समाजाचा बायबल" असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हणटले आहे. 

  • १८७५ मध्ये न्या. रानडे यांनी पुण्यामध्ये आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांची मिरवणुक काढली या बाबत ज्योतीबांनी रानडे यांना सहकार्य केले. 
  • लोकमान्य टिळक व आगारकर यांच्या सामाजिक कार्यामुळे ज्योतीबानी त्यांचा पुणे येथे सत्कार केला.
  • फुले यांचे वर्णन शिक्षण व समता या शब्दांमध्ये केले जाते. 
  • महात्मा फुले यांना "महाराष्ट्राचे मार्टीग ल्युथर किंग' ही पदवी शाहु महाराज यांनी दिली. 
  • ज्योतीबांना "हिंदुस्थानचा बुकर वाशिंग्टन' ही पदवी सयाजीराव गायकवाड यांनी दिली. 
  • "आद्य दलील उद्धारक, पतीतांचा पालनहार" असे उद्गार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी फुले यांच्या बद्दल काढले. 
  • "लोक मुझे महात्मा कहते हैं, असली महात्मा तो ज्योतीबा थे" असे उद्गार १९३२ साली महात्मा गांधी यांनी येरवड्याच्या तुरुंगातून काढले. 
  • ज्योतीबा फुले हे कट्टर "एकेश्वरवादी" होते. एकेश्वरवादाची संकल्पना मांडताना परमेश्वर हा "निर्गुण निराकार" आहे असे ते म्हणत. मुर्ती पुजेस त्यांचा पुर्णपणे विरोध होता. ज्योतीबा हे परमेश्वरास "निर्मीक" असे म्हणत. 
  • विष्णुबुवा ब्रम्हचारी हे फुले यांचे समकालीन टिकाकार होते.