नाना जगन्नाथ शंकर सेठ (१८०३-१८६५)

  • नाना शंकर सेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. त्यांचे मुळ गाव "मुरबाड" हे होते. 
  • १८२२ मध्ये "बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी" या संस्थेची स्थापना त्यांनी केली. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका भारतीय मानसाने स्थापन केलेली ही पहीली संस्था होती. या संस्थेच्या माध्यमातुन १८४८ मध्ये नाना शंकर सेठ यांनी मुंबई येथे मुंलींची पहीली शाळा सुरु केली. (देशातील पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली) 
  • १८४५ मध्ये नाना शंकरसेठ यांनी मुंबई येथे ग्रँड मेडीकल कॉलेज" ची स्थापना केली. याच कॉलेजमधुन १८६१ पासुन वैद्यकिय शिक्षण मराठी भाषेतुन देण्याची व्यवस्था केली. 
  • १८४५ मध्ये शंकरसेठ यांनी स्टुडंट लिटररी अॅन्ड सायंटीफिक सोसायटी ची स्थापना मुंबई येथे केली. 
  • १८५० ते १८५६ या कालावधीत मुंबई प्रांताच्या "बोर्ड ऑफ एज्युकेशन" चे ते सदस्य होते. 
  • महत्वाचे :- नाना शंकरसेठ यांनी मुंबई विद्यापीठाचे "फेलो" म्हणून काम केले आहे. तसेच ते ब्रिटीश काळामध्ये भारतीय रेल्वेच्या संचालक मंडळावर सदस्य होते. 
  • महत्वाचे :- ब्रिटीशांनी नाना शंकरसेठ यांच्या कामावर खुष होवुन त्यांना "जस्टीस ऑफ पिस" पदवी दिली. (जस्टीस ऑफ पिस म्हणजे जनतेस न्याय मिळावा म्हणुन राजाने नेमलेला प्रतिनिधी) 
  • नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी "एल्फिस्टन हायस्कुल व कॉलेजची" स्थापना केली. तसेच आजचे मुंबईतील जे. जे. हॉस्पीटल उभारण्यासाठी नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी मोठ्याप्रमाणात प्रयत्न केले होते. 
  • महत्वाचे :- २६ ऑगस्ट १८५२ रोजी "बॉम्बे असोशिएशन" ही भारतातील पहीली राजकिय संघटना स्थापन केली. 
  • १८५७ मध्ये शंकरसेठ यांनी "दि जगन्नाथ शंकरसेठ फस्ट ग्रेड अँग्लो हायस्कुल" स्थापन केले. तसेच नाना जगन्नाथ शंकरसेठ हे मुंबई इलाक्याच्या कायदे मंडळाचे पहीले सदस्य होते. 
  • नाना जगन्नाथ शंकरसेठ यांचा मृत्यु ३१ जुलै १८६५ रोजी झाला. 
  • मुंबईचा पहिला गव्हर्नर "एल्फिस्टन" हा होता. नाना जगन्नाथ शंकरसेठ यांचे मुंबई गव्हर्नर सोबत असलेल्या संबंधामुळेच त्यांनी गर्व्हनर एल्फिस्टन यांच्या नावाने कॉलेज काढले होते.