राष्ट्रसत तुकडोजी महाराज (१९०९ ते १९६८)

  • तुकडोजी महाराजांचा जन्म २७ एप्रील १९०९ रोजी अमरावती जिल्हयातील "यावली" या गावी झाला. तुकडोजी महाराजांचे मुळनाव "माणिक बंडोजी ठाकुर-इंगळे" असे आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील आधुनिक राष्ट्र संत, भक्त, कवी व समाजसुधारक म्हणुन यांना ओळखले जाते. तुकडोजी महाराजांचे कुलदैवत पंढरपुरचा विठोबा हे होते. "जंजिरी भजने" हे तुकडोजींच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. 
  • १९३५ मध्ये तुकडोजी महाराजांनी अमरावती जिल्हयातील मोझरी येथे "गुरुकुंज आश्रम" ची स्थापना केली. 
  • आडकुजी महाराज हे तुकडोजी महाराजांचे गुरु होते. 
  • अखिल भारतीय पातळीवर त्यांनी "साधु संघटना" ची स्थापना केली. अनिष्ठ रुढी परंपरा, जातीभेद व अंधश्रद्धा इत्यादी समाज विघातक गोष्टींवर तुकडोजींनी टिका केली. 
  • राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार करुन देशभक्ती दर्शविण्याकरीता तुकडोजींनी १९३० सालच्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला होता. याच कालावधीत १९३६ साली गांधीजीच्या सहवासामध्ये असताना तुकडोजींचा डॉ.राजेंद्र प्रसाद, पंडीत नेहरु, मौलाना आझाद इत्यादी राष्ट्रीय नेत्यांशी संबंध आला. "भारत सेवक समाज" संघटनेचे काम करताना त्यांनी गुलजारीलाल नंदा यांचे सोबत काम केले. 
  • तुकडोजी महाराजांची "किर्तने" व "खजिरी भजने" प्रसिद्ध होती. 
  • व्यायामाचे महत्व सांगण्याकरीता तुकडोजींनी "आदेश रचना हा ग्रंथ लिहीला. 
  • ४१ अध्यायांचे ४६७५ ओवींचे असलेले "ग्रामगंथ" हा प्रसिद्ध काव्यसंग्रह त्यांनी लिहीला. विवीध प्रकारची ४० पुस्तके लिहीली. त्यांची काव्य रचना हिंदी व मराठी होती. 
  • १९४२ मधील चलेजाव चळवळीमध्ये तुकडोजी महराजांनी तुरुंगवास भोगला. हा तुरुंगवास भोगताना तुकडोजी महाराजांनी "सुविचार स्मरणी" हा ग्रंथ लिहीला. 
  • १९५५ मध्ये तुकडोजी महाराज विश्वधर्म व विश्व शांती परीषदेसाठी जपानला गेले. 
  • १९६६ मध्ये प्रयाग येथे भरविण्यात आलेल्या विश्व हिंदू परीषदेचे अध्यक्षस्थान तुकडोजी महाराजांनी भुषविले. 
  • राष्ट्रपती भवनामध्ये तुकडोजी महाराजांनी म्हणटलेल्या "जंजिरी भजने" ऐकुन देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना "राष्ट्रसंत" ही पदवी बहाल केली. 
  • ११ ऑक्टोबर १९६८ रोजी अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथील "गुरुकुंज" या आश्रमामध्ये त्यांचा देहवसन झाले. त्यांचे समाधीस्थळ मोझरी, जि.अमरावती येथे आहे. 
  • त्यांच्या स्मृतीपृत्यार्थ १९२५ मध्ये स्थापन झालेल्या नागपुर विद्यापीठास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. तुकडोजी महाराजांची साहित्य रचना :- 
  1. ग्रामगिता
  2. सेवा स्वधर्म 
  3. अनुभव सागर भजनावली
  4. राष्ट्रीय भजनावली