पंडीत जवाहरलाल मोतीलाल नेहरु (१८८९-१९६४)

  • पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी मोतीलाल नेहरु यांच्या घरी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे घराला "आनंद भुवन" नाव देण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर हा दिवस "राष्ट्रीय बाल दिन" म्हणुन साजरा केला जातो. 
  • १९१६ मध्ये पंडीत नेहरुंचे लग्न "कलम कौल" यांच्याशी झाले व १९१७मध्ये त्यांना "इंदिरा प्रियदर्शनी" यांच्या रुपाने कन्यारत्न प्राप्त झाले. 
  • पंडीतजींनी कॅब्रीज विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. 
  • पहील्यांदाच १९२९ च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले व संपुर्ण स्वराज्याची मागणी केली. 
  • १९३६ च्या फैजपूर येथील ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 
  • १९३५ मध्ये अलमेडा येथील तुरंगात असताना "अॅन अॅटोबायोग्राफी" हे स्वतःचे आत्मचरित्र लिहीले. 
  • १९४० मध्ये सुरु झालेल्या वैयक्तिक सत्याग्रहाचे ०२ रे वैयक्तिक सत्याग्रही होते. 
  • १९४२ मध्ये अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यात तुरुंगवास भोगत असताना त्यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" किंवा "भारत की खोज" हा प्रसिद्ध ग्रंथ लिहीला. 
  • ०२ सप्टेंबर १९४६ रोजी स्थापन झालेल्या हंगामी सरकारचे पहिले पंतप्रधान व पहिले परराष्ट्रमंत्री होते. 
  • पंडीत जवाहरलाल नेहरु हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरु यांना "स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार" असेही म्हणटले जाते. 
  • १९५० मध्ये स्थापन झालेल्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडीतजी होते. देशासाठी "पंचवार्षीक योजना" ही मुळ संकल्पना पंडीत जवाहरलाल नेहरु यांचीच होती. पंडीतजींनी १९५१ सालापासुन देशामध्ये पंचवार्षिक योजना सुरु केल्या. 
  • १९५१ मध्ये पंडीतजींनी पहिल्या आशियाई क्रिडा स्पर्धा "दिल्ली" येथे भरविल्या. 
  • पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी १९५५ च्या बांडुग परीषदेमध्ये "अलिप्त राष्ट्र संघटना" ही महत्वपुर्ण संकल्पना मांडली. नेहरुंजींच्या प्रयत्नाने १९६१ मध्ये "अलिप्त राष्ट्र संघटना" (NAM) ही संस्था अस्तित्वात आली. 
  • "शांतीदुत" "आधुनिक भारताचे शिल्पकार" "आंतरराष्ट्रवादाचे जनक" असे संबोधले जाते. 
  • पंडीतजींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये "नॅशनल हेरॉल्ड" हे वृत्तपत्र सुरु केले होते. 
  • १९५४ मध्ये भारत व चीन दरम्यान "पंचशील करार' घडवुन आणला. 
  • ग्रंथ संपदा :- 
१) सोव्हियत रशिया
३) अॅन अॅटोबायोग्राफी
२) डिस्कव्हरी ऑफ इंडिया / भारत की खोज
४) लेटर फॉर्म फादर टु हिज डॉटर.