पचनग्रंथीचे प्रकार

1) लाळग्रंथी (Salivary Glands) : 
  • लाळग्रंथीच्या ३ जोड्या असतात.
  • या ग्रंथींमधून लाळरस स्त्रवतो, त्यामुळे पिष्टमय पदार्थांचे पचन होते.
अ) कर्णपूर्व ग्रंथी (Parotid Glands),
ब) अधो-हनुग्रंथी (Sub-maxillary), 
क) अधो-जिव्हाग्रंथी (Sub-Lingual).

2) यकृत (Liver) : 
  • मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी.
  • पित्ताशय (Gall Bladder) : यकृताच्या खालील उजव्या बाजूस पित्ताशय असते. त्यामध्ये ५० घनसेमी पित्त साठू शकते. 
  • पित्तनाल व स्वादूपिंडनाल यांची संयुक्त-पित्तनाल आद्यांत्रात उघडते.
  • पित्तामुळे मेदाच्या पचनास मदत होते. 
3) स्वादुपिंड (Pancreas) : 
  • यामधून स्त्रवलेल्या स्वादुपिंडरसामुळे. अन्नाच्या पचनास मदत होते व त्यातील इन्शुलिन द्रव्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते.

Comments