मानवी पचनसंस्था

मानवाच्या पचनसंस्थेत अन्ननलिका आणि पचनग्रंथींचा समावेश होतो.
  • अन्ननलिकेचा मार्ग : मुखगुहा → ग्रसनी → ग्रासिका → जठर → लहान आतडे → मोठे आतडे 
  • पचनग्रंथी : लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड.
1) मुख-गुहा : 
  • अन्ननलिकेची सुरुवात मुखगुहेपासून (मुखापासून) होते.
  • मुखगुहेच्या तळाशी जीभ असते व दोन्ही जबड्यात दातांची मालिका असते.
  • दात : मानवास प्रत्येक जबड्यात १६ याप्रमाणे ३२ दात असतात.
  • द्विदारदंती (डायफोडन्ट) : मानवाच्या आयुष्यात दातांचे दोन संच येतात. 
* दातांचे चार प्रकार *
अ) दुधाचे दात : संख्या २०, उपदाढा नसतात.
ब) कायम संच : वयाच्या ७ वर्षांनंतर दुधाचे दात पडून त्यांची जागा कायमस्वरुपी दात घेतात.
  • जीभ : जीभ मुखगुहेच्या तळाशी जिव्हाबंधाने (Frenulum) चिकटलेली असते. 
  • जीभेवर रुचिकालिका (Taste Buds) आणि अंकुरक (Papillae) असतात.. 
2) ग्रसनी (Pharynx) :
  • नरसाळ्याच्या आकाराच्या ग्रसनीत श्वसनमार्ग अग्रभागी आणि अन्नमार्ग मध्यभागी असतो.
  • अधिकंठ (Epiglottis) : ग्रसनीच्या कंठद्वाराजवळ असलेली अधिकंठ ही झडप अन्न गिळताना कंठदार | झाकते, त्यामुळे अन्नमार्ग व श्वसनमार्ग स्वतंत्रपणे कार्य पार पाडतात.
3) ग्रासिक (Oesophagus): 
  • ग्रासिका रंध्रापासून जठरापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग
  • मध्यपटल (Diaohraam) वक्ष आणि उदर पोकळी विभागणारा स्नायूमय आडवा पडदा 
  • उदरात ग्रासिकेचे रुपांतर जठरात होते. 
4) जठर (Stomach) :
  • उदराच्या डाव्या बाजूला मध्य पटलाखाली इंग्रजी 'J' आकाराचे जठर असते. 
  • जठरातील जठरग्रंथीतून जाठररस स्रवतो. 
  • जठराचे मुख्य कार्य : अन्न साठविणे व अन्नाचे अंशतः पचन करणे 
5) लहान आतडे (Small Intestine) : 
  • लांबी : सहा ते सव्वासहा मिटर 
  • लहान आतड्याचे तीन भाग पुढीलप्रमाणे
अ) आद्यांत्र (Deodenum) : लांबी : २५ सें.मी., इंग्रजी 'C' आकार.
  • आद्यांत्रात ‘स्वादुपिंड-पित्त संयुक्तवाहिनी' येऊन मिळते. 
ब) मध्यांत्र (Jejunum) : लांबी : २ ते ४ मीटर.
क) पश्चांत्र (Ileum) : याच्या आतील स्तरात अनेक घड्या (Folds) असून त्यातील ग्रंथींमधून आंत्ररस स्त्रवतो.
  • लहान आतड्याचे कार्य : अन्नाचे संपूर्णतः पचन आणि पचलेल्या अन्नाचे शोषण करणे. 
6) मोठे आतडे (बृहदांत्र-Large Intestine) :
  • लांबी : सुमारे दीड मीटर, व्यास लहान आतड्याच्या व्यासापेक्षा मोठा असतो. 
  • यामध्ये आंत्रपुच्छ (Appendix - लांबी ५-१५ सेंमी) समाविष्ट असते. 
  • बृहदांत्रानंतरच्या पुढचा भाग पूर्वबहदांत्र व त्यानंतरच्या सरळ अन्ननलिकेला गुदांत्र (Rectum) म्हणतात: 
  • मोठ्या आतड्याची कार्ये : पाणी शोषण, तात्पुरता मलसंचय व मलोत्सारन.

Comments